राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरूच; अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरूच; अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांना पत्र लिहित आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय मागे घेण्याची शरद पवार यांनी विनंती केली. तसचं कालपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अशातच अनेक जण आपल्या पदाचा राजीनामादेखील देताना दिसत आहेत. आता हे सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीये, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांना पत्र लिहित आमदारकीचा राजीनामा दिला आहे.(  Resignation session continues in NCP Anil Patil s resignation from MLA Post After Resignation of Sharad Pawar From NCP President Post  )

अनिल पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा पत्र पाठवलं आहे. पवार साहेब, तुम्हाला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित केला आहे. शरद पवार यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. किमान 2024 च्या निवडणुका होईपर्यंत तरी राजीनामा देऊ नका, अशी विनंती शरद पवार यांना केली आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

निर्णयामुळे कार्यकर्ते खचून गेले- अनिल पाटील

पाटील यांनी पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आला. आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत.

राजीनामा मागे घ्या

आपण घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

( हेही वाचा: भाजपाची नवी कार्यकारिणी बावनकुळेंकडून जाहीर; बाराशे सदस्यांची जम्बो टीम )

पवारांचा राजीनामा ही नवी खेळी?

अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांनी नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा केली जात आहे. वयाच्या 83 व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे शरद पवार यांनी दाखवून देण्यासाठीच राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे.

First Published on: May 3, 2023 3:25 PM
Exit mobile version