‘परबांनी निर्दोष असल्याचं … ‘; सोमय्यांचं परबांना प्रत्युत्तर, म्हणाले… ‘हिशोब तर घेणारच’

‘परबांनी निर्दोष असल्याचं … ‘; सोमय्यांचं परबांना प्रत्युत्तर, म्हणाले… ‘हिशोब तर घेणारच’

Anil Parab on Kirit Somaiya about Sai Resort Ratnagiri

साई रिसॉर्ट प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हरित लवादामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्यानंतर आज, 29 मे 2023 रोजी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. सोमय्यांनी ठाकरे सरकार आणि माझी बदनामी करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले अशी टीका अनिल परब यांनी केली तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ( Sai Resort case Kirit Somaiya gave an answer to Anil Parab on Petition filed in Green Arbitration )

काय म्हणाले परब?

साई रिसॉर्ट प्रकरणात मी सांगत होतो की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. साई रिसॉर्ट हे माझ्या मित्राचं आहे मी त्याला जागा विकली होती. परंतु जाणूनबुजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले. मी माझी बदनामी झाल्याचा खटका उच्च न्यायालयात दाखल केलेला आहे. मी सुरुवातीपासूनच सांगत आहे की या प्रकरणात काहीही तथ्य नाही. किरीट सोमय्या हे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. आमच्यावर दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत हे आम्ही न्यायालयात सिद्ध करु. परंतु सोमय्यांनी दाखल केलेली याचिका त्यांना मागे घ्यावी लागत आहे. त्यामुळे एकतर या याचिका मागे घ्याव्या लागतील किंवा या याचिकांमधून आम्हाला न्याय तरी मिळेल, असा विश्वास परबांनी व्यक्त केला.

तसचं, या सर्व प्रकरणात एक दिवस सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर आम्ही जो 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे ते 100 कोटी द्यावे लागतील, असंही परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

सोमय्यांचं परबांना प्रत्युत्तर

सोमय्या म्हणाले की, तुमचे पार्टनर सदानंद कदम हे जेलमध्ये आहेत तसचं, तुम्ही बेलवर बाहेर आहात. कुठलीही याचिका मागे घेण्याचा प्रश्नच उद्घभवत नाही. अनिल परब यांच्यावर सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनिल परब उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही खर्च केलेले साडेदहा कोटी रुपये कुठून आले, याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आयकर विभागाने अनिल परब यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. परब निर्दोष आहेत, तर जामीनावर का सुटले? जेलमध्ये राहून सत्याग्रह करायचा होता. जो जेल आणि जामिनावर बाहेर आहे त्याने निर्दोष असल्याचं सांगू नये, असा टोला सोमय्यांनी परब यांना लगावला आहे.

( हेही वाचा: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळे हटवण्याची हिम्मतच कशी झाली; छगन भुजबळ संतापले )

सोमय्या म्हणाले की, परबांनी समुद्राची जागा बळकावली होती. रिसॉर्ट प्रकरणीच सदानंद कदम जेलमध्ये आहेत. निर्दोष असते, तर जेलमध्ये का घातलं? तात्पुरती कारवाई होऊ नये म्हणून न्यायालयाक का गेलात? अजून तर हिशोब व्हायचा आहे. रिसॉर्ट अनिल परबांनी बांधला असून, त्यांच्याकडून विकत घेतला आहे, असं सदानंद कदम यांनी सांगितलं आहे. अनिल परबांनी चोरी, लबाडी आणि अनधिकृत काम केली आहेत. त्यांचे सहकारी जेलमध्ये आहेत, मग हे बाहेर कसं राहू शकतील. हे सध्या जामीनावर आहेत. काही दिवसांचा दिलासा, असा सूचक इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.

First Published on: May 29, 2023 5:56 PM
Exit mobile version