सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, शस्त्राच्या परवान्यासाठी केला अर्ज?

सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, शस्त्राच्या परवान्यासाठी केला अर्ज?

बंदुकीच्या शोधात मुंबई क्राइम ब्रँच सुरतमध्ये; तापी नदीत सर्च ऑपरेशन

बिश्नोई गँगकडून पंबाजी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान रडारवर आहे. यासाठी बिश्नोई गँगकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्रही प्राप्त झाले होते. त्यामुळे सलमानने आता शस्त्र परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्याने आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. (Salman Khan met Mumbai Police Commissioner vivek Fansalkar)

हेही वाचा – बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ वर स्थगिती

आज शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान सलमान खान क्रॉफर्ड मार्केट येथील मुंबई पोलीस मुख्यालयात आला होता. यावेळी त्याने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्याने गन लायन्ससाठी अर्जही केला असल्याचं म्हटलं जात आहे.

पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली होती. पूर्ववैमन्यस्यातून बिश्नोई गँगने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सलमान खानलाही हत्येची धमकी मिळाली आहे. काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई गँगने त्याला धमकी दिली आहे. काळवीट प्रकरणी सलमान खानने त्याच्या वडिलांसोबत सर्वांसमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी बिश्नोई गँगने केली होती. तसे न झाल्यास  सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा – पलक तिवारीची सलमान खानच्या बिग बजेट चित्रपटात एन्ट्री; या अभिनेत्यासह करणार अभिनय

काय आहे काळवीट प्रकरण? 

हम साथ साथ है या बॉलिवूड चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान १९९८ मध्ये सलमान खानने काळवीटचं शिकार केल्याचा आरोप आहे. दोन काळवीटांची हत्या केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालायने सलमानला एप्रिल २०१८ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला सलमानने वरच्या न्यायालयातही आव्हान दिले होते. याप्रकरणी सलमान खान जोधपूर तुरुंगातही होता. त्यानंतर त्याची भरतपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

हत्येचा प्रयत्न फसला

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये सलमान खानच्या हत्येसाठी सर्व तयारी केली असल्याचाही खुलासा नुकताच आला होता. त्याच्या हत्येसाठी बिश्नोईने चार लाखांचं एक खास रायफलही खरेदी केलं होतं. यासाठी त्याने संपत नेहरा याला नेमलं होतं. संपत नेहरा सलमानच्या हत्येसाठी मुंबईतही आला होता. नेहराने सलमानच्या मुंबईच्या घराची रेकी केली. या रेकीदरम्यान त्याला जाणवलं की हत्येसाठी लांबंच लक्ष्य हेरणारी रायफल गरजेची आहे. त्यामुळे त्यावेळी हल्ला होऊ शकला नाही.

First Published on: July 22, 2022 6:19 PM
Exit mobile version