बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ वर स्थगिती

'बिग बॉस 16' शोला स्थगित करण्यात आलं आहे. खरंतर सध्या हिंदी कलर्स वाहिनीवर 'खतरो के खिलाडी 12' हा रियालिटी शो चालू आहे

हिंदी टेलिव्हिजनवरील रियालिटी शो ‘बिग बॉस 16’ ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान या शोबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अफवा पसरवल्या जात आहेत की, ‘बिग बॉस 16’ शोला स्थगित करण्यात आलं आहे. खरंतर सध्या हिंदी कलर्स वाहिनीवर ‘खतरो के खिलाडी 12’ हा रियालिटी शो चालू आहे, तसेच हा शो बऱ्याच दिवसांपर्यंत चालू राहिल, त्यानंतर ‘झलक दिखला जा’ हा सुद्धा शो प्रसारित करण्यात येणार आहे. एका मागे एक आलेल्या या कार्यक्रमांमुळे बिग बॉसचे चाहते कोड्यात पडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ‘बिग बॉस 16’ येत्या नोव्हेंबर 2022 पर्यंत स्थगित केला जाईल.

मात्र आता ‘बिग बॉस 16’ च्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत खुलासा करण्यात आला आहे की, ‘बिग बॉस 16’ ला स्थिगित केले जाणार नाही. अशावेळी असं होऊ शकतं की, ‘बिग बॉस 16’ आणि ‘झलक दिखला जा’ हे दोन्ही कार्यक्रम एकत्र वेगवेगळ्या वेळेनुसार चॅनेलवर दाखवले जातील.

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी 2’ ऑगस्ट महिन्यापासून वूटवर दाखवले जाईल. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, ‘बिग बॉस ओटीटी 2’ चे काही स्पर्धक ‘बिग बॉस 16’ सुद्धा दिसू शकतात. ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये या वेळी मिस्टर फैजू, आजमा फल्लाह, पूनम पांडे, मुनव्वर फारूकी, अरुशी दत्ता आणि केविन अलमासिफर यांसारखे कलाकार दिसून येतील. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 16’ मध्ये दिव्यांका त्रिपाठी, सनाया ईरानी, अर्जुन बिजलानी, टीना दत्ता आणि शिवांगी जोशी हे कलाकार दिसून येतील.


हेही वाचा :‘धनंजय माने इथेच राहतात का’ : मीम्स बनविणाऱ्याने घेतली अशोक सराफांची भेट