भुजबळ यांना ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

भुजबळ यांना ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

ओबीसीचे राष्ट्रीय नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा निषेध व्यक्त करुन त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची मागणी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने करण्यात आली. तालुकाध्यक्ष भाऊसाहेब हराळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, निलेश घाडगे, रावसाहेब हराळे आदींसह समाज बांधवांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नेमकं काय आहे प्रकरण?

छगन भुजबळ हे ओबीसीचे राष्ट्रीय नेते असून, समता परिषदेचे संस्थापक आहेत. नुकतेच त्यांच्या नाशिक येथील निवासी पत्त्यावर निनावी पत्राने दाभोळकर, पानसरे यांच्या प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी मनुस्मृती जाळून राज्यातील ज्वलंत प्रश्‍नावर आवाज उठविला आहे. शासनाचे अनेक विषयावर वाभाडे काढले असून, त्यांच्याबद्दल समाजकंटकामध्ये आकस निर्माण झालेला आहे. या आकसापोटी त्यांना धमकी देण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

काय आहे पत्रामध्ये?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचे तीन पानी पत्र आले आहे. या पत्रामध्ये मनुस्मृतीसोबतच संभाजी भिडे गुरुजींचं देखील नाव घेण्यात आलं आहे. हे पत्र कम्प्युटरवर टाईप केलेलं आहे. त्यामुळे अक्षरावरून ओळख पटणं कठीण आहे. मात्र, या पत्रामध्ये शिवराळ भाषा वापरल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रामध्ये ‘इडी’ची कारवाई, न्यायालयीन खटला आणि इतर तपशीलही आहे.


हेही वाचा – ‘…तर तुमचाही दाभोलकर करू’, छगन भुजबळांना धमकी

First Published on: October 30, 2018 3:18 PM
Exit mobile version