घरमहाराष्ट्र'...तर तुमचाही दाभोलकर करू', छगन भुजबळांना धमकी

‘…तर तुमचाही दाभोलकर करू’, छगन भुजबळांना धमकी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारं एक पत्र त्यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्मवर आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. ही धमकी नक्की कुणी दिली, याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली, तरी धमकीच्या पत्रातल्या मुद्द्यांवरून ती कुणी दिली असेल, याविषयी अंदाज बांधले जाऊ लागले आहे. ‘मनुस्मृतीला जर तुम्ही विरोध केलात, तर तुमचाही दाभोलकर, पानसरे करू, तुम्हाला जीवे मारू‘, अशा आशयाचं एक निनावी पत्र भुजबळांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्मवर पोहोचलंय. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील पदाधिकारी लागलीच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळांनी आम्हाला मनुस्मृती नको तर बाबासाहेबांचं संविधान हवंय‘, असं विधान नागपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना केली होतं. त्यासंदर्भातच ही धमकी देण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पत्रामध्ये शिवराळ भाषा

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचे तीन पानी पत्र आले आहे. या पत्रामध्ये मनुस्मृतीसोबतच संभाजी भिडे गुरुजींचं देखील नाव घेण्यात आलं आहे. हे पत्र कम्प्युटरवर टाईप केलेलं आहे. त्यामुळे अक्षरावरून ओळख पटणं कठीण आहे. मात्र, या पत्रामध्ये शिवराळ भाषा वापरल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रामध्ये ‘इडी’ची कारवाई, न्यायालयीन खटला आणि इतर तपशीलही आहे. यासंदर्भात दुपारी माजी आमदार जयंत जयंत जाधव यांनी पोलिस आयुक्तांकडे लिखीत तक्रार केली आहे.

- Advertisement -

‘माय महानगर’च्या हाती प्रत्यक्षात हे पत्र जरी आले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रातला मजकूर पुढीलप्रमाणे :

‘मनुस्मृतीचे पुरस्कर्ते भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी यांची ताकद काय आहे हे माहीत करून घ्यावे. तुम्हाला संपविण्यास आम्हाला काहीही वेळ लागणार नाही. हा धमकीचा इशाराच समजा. गुरुजींबद्दल बोलल्यास परिणामांना सज्ज रहावे. समीर भुजबळंकडेसुद्धा आम्ही बघणार आहोत. पुन्हा भिडे गुरुजींबद्दल एक वाक्‍यही तोंडातून काढू नये. अन्यथा तुमचा दाभोलकर-पानसरे झालाच म्हणून समजा.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -