क्रांती रेडकरशी विवाह २०१७ मध्ये’ त्या प्रकरणाशी संबंध कसा? वानखेडेंचा मलिकांच्या आरोपांवर सवाल

क्रांती रेडकरशी विवाह २०१७ मध्ये’ त्या प्रकरणाशी संबंध कसा? वानखेडेंचा मलिकांच्या आरोपांवर सवाल

Defamation notice: नवाब मलिकांविरोधातील वानखेडेंच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. क्रांती रेडकरशी २०१७ मध्ये विवाह झाला तर मेहुणीचे प्रकरण हे २००८ मधील आहे. तेव्हा मी सर्व्हिसमध्येही नव्हतो अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे. तर त्या घटनेशी माझा संबंध कसा असा सवालही वानखेडेंनी नवाब मलिकांना केला आहे. तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवयासायात गुंतली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी ट्विट करत वानखेडेंना केला आहे. यावर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक ट्विट करत आरोप केला आहे. क्रांती रेडकरची बहीण आणि समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकरवर ड्रग्ज प्रकरणी २००८ मध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्या प्रकरणाची पुढील चौकशी मार्च २०२२ मध्ये आहे. या प्रकरणाची तुमचा संबंध काय याबाबत वानखेडेंनी खुलासा कारावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडे म्हणाले की, क्रांती रेडकरच्या बहिणीवर ड्रग्ज प्रकरणी कारवाई २००८ साली करण्यात आली आहे. त्यावेळी मी सर्व्हिसमध्येही नव्हतो. तर क्रांती रेडकरसोबत लग्न २०१७ साली झालं आहे. त्यापुर्वी काय झाले त्याच्याशी माझा संबंध कसा येईल? असा उलट सवाल वानखेडे यांनी नवाब मलिकांना केला आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय?

नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडेंना प्रश्न विचारले आहेत. वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकरविरोधात एक केस पुण्यातील कोर्टात पेंडींग आहे. ही ड्रग्ज प्रकरणातील केस असून याची पुढील सुनावणी मार्च २०२२ आहे का? हे प्रकरण खरं आहे का? आणि याच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित आहे का? असा सवाल मलिकांनी केला आहे.


हेही वाचा : drug case: वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, नवाब मलिकांचा सवाल

First Published on: November 8, 2021 11:33 AM
Exit mobile version