घरताज्या घडामोडीdrug case: वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, नवाब मलिकांचा सवाल

drug case: वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, नवाब मलिकांचा सवाल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा ट्विट करत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी नवाब मलिकांनी थेट क्रांती रेडकरच्या बहिणीचे जुने प्रकरण समोर आणलं असून वानखेडेंना सवाल केला आहे. वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर ही ड्रग्ज व्यवसायात आहे का? असा सवाल नवाब मलिकांनी केला असून याचे उत्तर वानखेडेंनी द्यावे अशी मागणी केली आहे. समीर वानखेडे आणि मोहित भारतीय हे पार्टनर असून त्यांनीच हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यानंतर आता वानखेडेंच्या मेव्हणीवरही नवाब मलिकांनी निशाणा साधला आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे दहशत निर्माण करुन कलाकरांकडून वसुली करत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची कारवाई ही बनावट होती यामध्ये मोहित भारतीय यांचाही समावेश असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. तर आता ड्रग्ज प्रकरणावरुन मलिकांनी थेट वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्यावरुनही सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना सवाल केला आहे. मलिक म्हणाले की, एक केस पुण्यातील कोर्टात पेंडींग आहे. ही ड्रग्ज प्रकरणातील केस असून याची पुढील सुनावणी मार्च २०२२ आहे का? हे प्रकरण खरं आहे का? आणि याच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? वानखेडेंची मेहुणी हर्षदा रेडकर ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित आहे का? असा सवाल मलिकांनी केला आहे. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी यावर उत्तर द्यावे अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत हर्षदा रेडकर यांची न्यायालयात केस पेंडींग असल्याचे दाखवले आहे. यामध्ये हर्षदा रेडकर यांच्यावर २००८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च २०२२ मध्ये असल्याचे नमूद करण्यात आले असून आणखी दोन जणांचा या प्रकरणामध्ये समावेश आहे.


हेही वाचा : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पंढरपुरात यंदा कार्तिकी यात्रा होणार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -