समृद्धी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ३१ मार्चपर्यंत २८ मृत्यूची नोंद

समृद्धी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ३१ मार्चपर्यंत २८ मृत्यूची नोंद

समृद्धी महामार्ग बनून जवळपास १०० दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचं सांगितलं जात आहे. कारण ३१ मार्चपर्यंत २८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यासंबंधीत अपघाताची आकडेवारी महामार्ग पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे.

अधिकृतपणे समृद्धी महामार्गावरील नागपूर, औरंगाबाद आणि पुणे विभागात २५३ अपघात झाले असून ३१ मार्चपर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात नागपूर विभागात झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक नसल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. हा वेग मर्यादा ताशी १२० आहे. बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याच्या घटना किंवा वन्यजीव प्राणी रस्त्यांवर येत असल्याने अपघातास कारण ठरत आहे.

विदर्भात सर्वाधिक वन्यजीव प्राण्यांचे स्थळ असल्याने नागपूर विभागात सर्वाधिक अपघात दिसून येत आहे. नागपूर विभागातील खुर्सापुर, जाम, धामणगाव रेल्वे, आमनी, मलकापूर मिळून १२ जीवघेणी अपघातं घडली आहेत. तर औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना दोन्ही ठिकाणी मिळून ४ जीवघेण्या अपघातांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादनंतर पुणे विभाग मिळून एकूण राज्यभरात ३१ मार्चपर्यंत १७ जीवघेण्या अपघातांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ गंभीर अपघातंही झाली आहेत. तसेच या अपघातांमध्ये १०९ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे विभाग मिळून एकूण राज्यभरात ३१ मार्च पर्यंत १७ जीवघेण्या अपघातामध्ये २८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ४२ गंभीर अपघातांमध्ये १०९ गंभीर जखमी झाले आहे.


हेही वाचा : राष्ट्रवादीचा कल भाजपाकडे, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा


 

First Published on: April 17, 2023 10:16 AM
Exit mobile version