घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीचा कल भाजपाकडे, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

राष्ट्रवादीचा कल भाजपाकडे, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Subscribe

मागील काही दिवसांपासून राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठकीचं सत्र सध्या सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यात सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. परंतु शरद पवारांची भाजपसोबत सुरू असलेली जवळीक पाहता शिंदे गटाच्या आमदाराने मोठा दावा केला आहे.

भाजपसोबत जाण्यासाठी पवार कुटुंबाला लक्ष केलं जातंय. कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून केला आहे. राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवारांनी इशारा दिला असावा, असं माझं मत आहे. दीड तासांची बैठक चहा-पाण्यावर किंवा एक वाक्य बोलून होत नसते. पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नाही, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यास तयार असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना राहायचं नाहीये. परंतु त्यांचा कल भाजपाकडे आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार, प्रफूल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही, असंही शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

अजित पवार भाजपासोबत गेल्यानंतर शिवसेनेची काय भूमिका असणार? असा प्रश्न शिरसाटांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती आहे का?, असा सवाल देखील शिरसाट यांनी उपस्थित केला.


हेही वाचा : आम्ही मरण पत्करू, पण…, नऊ तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -