सांगलीत ‘सैराट’; बहिणीच्या नवऱ्याची हत्या

सांगलीत ‘सैराट’; बहिणीच्या नवऱ्याची हत्या

हत्या

ऑनर किलिंगच्या घटनेने सांगली जिल्हा हादरल आहे. बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून बहिणीच्या नवऱ्याचा खून करण्यात आला आहे. ओंकार माने (२२) असे मृताचे नाव असून निखिल सुधाकर सुतार (२१) असे संशयिताचे नाव आहे. तसेच आरोपी खुनाच्या घटनेनंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावात कुटुंबीयांचा विरोध झुगारून बहिणीने प्रेमविवाह केला. या रागातून तिच्या पतीचा भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे.

कुटुंबीयांचा विरोध असल्याने निखिल सुतार याच्या बहिणीने घरातून पळून जाऊन ओंकारसोबत लग्न केले होते. लग्नानंतर हे नवदाम्पत्य जिल्ह्याबाहेर राहत होते. काही दिवसांपूर्वीच ओंकार पत्नीसह गावात आला होता. त्याने गावात राहू नये, असा सुतार कुटुंबीयांचा आग्रह होता. यावरून निखील सुतार आणि ओंकार माने या दोघांमध्ये वादही झाला होता. मात्र, सुतार कुटुंबीयांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ओंकार माने हा पत्नीसह गावात राहण्यासाठी आला होता.

दरम्यान, शनिवारी रात्री ओंकार गावातील चव्हाण वाड्याजवळ थांबला होता. यावेळी अंधारातून आलेल्या निखील सुतारने ओंकारवर हल्ला केला. गुप्तीने पोटात वार केल्याने ओंकार जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर हल्लेखोर निखील हा गुप्तीसह सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


हेही वाचा – नवी मुंबईतील लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!


First Published on: July 12, 2020 1:24 PM
Exit mobile version