घरमहाराष्ट्रनवी मुंबईतील लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

नवी मुंबईतील लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

Subscribe

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुण्यात वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यापाठोपाठ आता नवी मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. नवी मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

याआधी नवी मुंबईत ३ जुलै ते १३ जुलैपर्यंत असा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता नवी मुंबईत १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते १९ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत पूर्वीप्रमाणेच नियम व अटी असणार आहेत, मात्र लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी नागरिकांनी लॉकडाूनच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कझाकस्तानमध्ये कोरोना संक्रमणामुळे ‘अज्ञात न्यूमोनियाची’ साथ पसरली – WHO


नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज नवी मुंबईत २५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार १३२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत तब्बल ५ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -