मोहमाया-सत्तेचा लोभ नाही, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

मोहमाया-सत्तेचा लोभ नाही, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आपली बाजू मांडली. आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. आम्ही लढणारे लोक आहोत आणि लढत राहू. शेवटी सत्याचा विजय होतो, असं संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut beliefs in uddhav thackeray decision)

हेही वाचा – अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

मोहमाया, सत्ता याचा आम्हाला अजिबात लोभ नाही. सध्या आमच्या सोबत असलेल्या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा सद्भावना व्यक्त केल्या आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


मातोश्री हे शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचं मूळ स्थान आहे, त्यामुळे ते वर्षावरून मातोश्रीवरून जाणं साहजिकच आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणाऱ्या तुम्ही चुकीच्या बातम्या चालवत आहात. त्या कृपया बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत आणि तेच राहतील, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा – बंडखोरीमागे नाव एकनाथ शिंदेंचे, पण हे भाजपचे षडयंत्र – आमदार नितीन देशमुख

सभागृहात जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही ते नक्कीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एकनाथ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा कोणताही सल्ला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला नाही. उलट त्यांनी आपण ही लढाई शेवटपर्यंत लढत राहू अशीच भावना व्यक्त केली आहे.

First Published on: June 22, 2022 9:24 PM
Exit mobile version