देशाला ‘महाराष्ट्र मॉडेल’सारखं काम करावच लागेल – संजय राऊत

देशाला ‘महाराष्ट्र मॉडेल’सारखं काम करावच लागेल – संजय राऊत

देशातील कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर देशाला एक ना एक दिवस महाराष्ट्र मॉडेल वापरावच लागेल, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, असं देखील म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने याची मागणी करत आहेत, असं राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राजकारणी हे सतत महाराष्ट्राला बदनाम करत राहिले, पण आज महाराष्ट्र ज्या पद्धतीने या संकटाशी सामना करतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल. हे महाराष्ट्र मॉडेल आहे ते एक दिवस देशाला वापरुन महामारीला तोंड द्यावं लागेल, असं राऊत म्हणाले. यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याच्या टीप्पणी वर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले एक महिना बोलत आहेत. मुख्यमंत्री सातत्याने केंद्राकडे मागणी करत आहेत की राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा. हे राष्ट्रीय संकट आहे जगाने मान्य केलं

महाराष्ट्र सरकारने जी काही मागणी केली असेल तर पुरवठा करावा लागेल. खासकरुन लसीचा साठा केंद्राला पुरवावा लागेल. लसीचा तुटवडा का होतोय याला जबाबदार राज्य सरकार नाही
हे सगळं नियंत्रण केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राच्या परवानगीशिवाय ना लस मिळत, ना औषधं मिळत ना इतर साहित्य मिळत. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळात नाराजी व्यक्त केली असेल तर ती टीका न समजता ती सूचना समजायला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

 

First Published on: April 29, 2021 10:40 AM
Exit mobile version