माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे, मी दमडीचाही घोटाळा केला नाही- किरीट सोमय्या

माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे, मी दमडीचाही घोटाळा केला नाही- किरीट सोमय्या

मुंबईः INS विक्रांत घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्यांनी 58 कोटी लाटल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला होता. त्यालाच आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे सरकारच्या पोलीसमध्ये एफआयआर नोंद झाली, पण मला एफआयआरची प्रत देत नाहीत. आम्ही एक दमडीचा घोटाळा केला नाही. 58 कोटींचा विक्रांत घोटाळा संजय राऊतांनी काल घोषित केला. पण आश्चर्याची बाब म्हणजे अजूनपर्यंत संजय राऊत एक कागदही देऊ शकलेले नाहीत, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय. किरीट सोमय्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करीत आहे. 58 कोटींचा विक्रांत घोटाळा संजय राऊतांनी काल घोषित केला. पण आश्चर्याची बाब म्हणजे अजूनपर्यंत संजय राऊत एक कागदही देऊ शकलेले नाहीत. ठाकरे सरकारच्या पोलीसमध्ये एफआयआर नोंद झाली, पण मला एफआयआरची प्रत देत नाहीत. आम्ही एक दमडीचा घोटाळा केला नाही. म्हणून माझं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान आहे, 58 कोटी गोळा केले, कुठले बॉक्स वापरले, कुठल्या चार बिल्डरकडे मनी लाँड्रिंग केलं हे सगळं संजय राऊतांनी काल स्वतः सांगितलंय. ती माहिती जनतेसमोर ठेवावी, असंही किरीट सोमय्यांनी अधोरेखित केलंय.

आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत. आम्ही कुठल्याही चौकशीला घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढतोय, काढतच राहणार आहोत. आता 12 वाजता जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांसोबत मी ईडी कार्यालयात भेट देत आहे. जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने अजित पवारांनी ताब्यात घेतला. तो त्या शेतकऱ्यांना परत करावा, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

देवेंद्र फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारावेत

तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली करतात हे पाहून आश्चर्य वाटले, फडणवीसांनी सोमय्यांना जोडे मारावेत. कायद्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. अर्थात आपल्या देशात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्यावर परदेशात पळवून पाठवले जाते. पण आयएनएस विक्रांतच्या संदर्भात देश भावना लोकभावना, सैनिकांचे बलिदान याच्याशी खेळ करून सैनिकांच्या बलिदानाचा बाजारात लिलाव करून मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील किरीट सोमय्या यांचं एक भयंकर राष्ट्रद्रोही भ्रष्टारातील प्रकरण बाहेर काढलं आहे. इतके होऊनही मला आश्चर्य वाटतं देवेंद्र फडणवीस राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व शिकवतात, परंतु त्यांनी काल एका राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला हे बघून स्वर्गात गोवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉ. हेगडेवार आणि आजचे संघचालक मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला होता.


हेही वाचाः देवेंद्र फडणवीसांकडून देशद्रोही सोमय्यांची वकिली, त्यांनी जोडे मारायला हवे होते, संजय राऊतांचा हल्लाबोल

First Published on: April 7, 2022 11:10 AM
Exit mobile version