काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून पुन्हा एकदा संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून पुन्हा एकदा संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

मागील अनेक दिवसांपासून सतत कश्मीरी हिंदूंना (Kashmiri Pandit) दहशतवाद्यांकडून लक्षं केले जात आहे. दहशतवाद्यांकडून (Terrorist) होणाऱ्या गोळीबारामुळे (Firing) जीवाच्या सुरक्षेसाठी काश्मिरी पंडितांनी एकत्र पलायनाचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “काश्मीरमधून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सरकार भाजपचे आहे. त्यावर भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. तुम्ही ताजमहल खालचं शिवलिंग शोधत आहात. तुम्ही ज्ञानवापी खाली शिवलिंग शोधून वाद निर्माण करत आहात. पण काश्मिरी पंडितांकडे दुर्लक्ष करत आहात”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर (BJP) निशाणा साधला. ते म्हणाले की, “काश्मीर हिंदू रक्ताने रोज भिजून चालला आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हत्या सुरू आहेत. आठ वर्ष कसले साजरी करताय? काश्मिर पंडित मरत आहेत. त्यावर बोला, टीका कसली करताय? १९९० मध्ये काश्मीर पंडितांची हत्या व पलायन झाले. तेव्हा भाजपच सत्तेवर होते. आताही सत्तेवर आहे. भाजपच्या रिपोर्ट कार्डमध्ये काश्मीर पंडितांच्या घरवापसीचा मुद्दा आहेत का? सर्जिकल स्ट्राईकनंतरही हत्या थांबल्या नाहीत. काश्मीरमध्ये रक्तपात होत आहे. काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली”, असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

हेही वाचा – अपक्ष आणि इतर पक्षांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआयची भीती दाखवतेय; संजय राऊतांचा गंभीर आरोप

काश्मीर फाईल्सचं प्रमोशन होतंय

“आमचे दिल्लीचे प्रमुख लोक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कधी काश्मीर फाईल्सचं प्रमोशन होतंय, तर कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतंय. पण काश्मिरी पंडितांचा आक्रोश कोणी ऐकायला तयार नाही. काश्मीरमधून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सरकार भाजपचं आहे. त्यावर भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. तुम्ही ताजमहल खालचं शिवलिंग शोधत आहात. तुम्ही ज्ञानवापी खाली शिवलिंग शोधून वाद निर्माण करत आहात. पण काश्मिरी पंडितांकडे दुर्लक्ष करत आहात”, असेही राऊत म्हणाले.

काश्मीरमध्ये मुस्लिमही सेक्युरिटी फोर्समध्ये काम करतंय. त्यांचीही हत्या होत आहे. श्रीनगरपासून पुलवामापर्यंत आतापर्यंत २० मुस्लिम जवानांची हत्या झाली. देशाचं संरक्षण करत आहेत. काश्मीर पंडितांना हाकलून लावले जात आहे. मारले जात आहे. त्यांना काश्मीर खोरे सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावे लागले आहे. पण सरकार काय करत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनवर निवेदन दिले आहे. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राची सरकार आणि शिवसेना काश्मीर पंडितांच्या बाजूने राहिल.”, असेही त्यांनी म्हटले.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे येत्या 15 जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. योध्या दौरा हा धार्मिक आहे. शक्तीप्रदर्शन करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘त्या’ विमानामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत वाढ

First Published on: June 5, 2022 11:24 AM
Exit mobile version