घरताज्या घडामोडी'त्या' विमानामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत वाढ

‘त्या’ विमानामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत वाढ

Subscribe

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना शनिवारी सुरक्षा स्थळी हलवण्यात आल्याचे समजते. व्हाईट हाऊसकडून (White House) याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना शनिवारी सुरक्षा स्थळी हलवण्यात आल्याचे समजते. व्हाईट हाऊसकडून (White House) याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या समुद्रकिनाऱ्या जवळील बीच हाऊसवरून एक विमान झोपावले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तोव जो बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन पूर्वेला असलेल्या रेहोबोथ किनाऱ्यावरील डेलोवेथ इथे हा प्रकार निदर्शनास आला. एक विमान अचानकपणे जो बायडन यांच्या बीच हाऊस येथील हवाई हद्दीत घुसले. या विमानाचा प्रवेश संशयास्पद मानला जात होता. मात्र हा कोणत्याही प्रकारचा हल्ला नव्हता, असे व्हाईटहाऊस कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Russia-Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युक्रेनसह रशियाचे ‘हे’ ३१ शत्रू देश, पाहा यादी

हे विमान चुकून बीच हाऊसच्या हवाई हद्दीत घुसले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने जो बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. मात्र या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जो बायडन आणि फर्स्ट जिल बायडन हे पुन्हा बिच हाऊस येथील घरी देखील परतले.

- Advertisement -

या घटनेची गंभीर दखल अमेरिकेच्या सिक्रेट सर्विसने घेतली आहे. चुकून हे विमान संरक्षित हवाई हद्दीत घुसल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी आता चौकशी करुन कारवाई देखील केली जाणार आहे.


हेही वाचा – Jio Price Hike: जिओचा स्वस्त प्लॅन १५० रुपयांनी महागला, ग्राहकांना झटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -