जसे प्रयागराज झाले तसाच संभाजीनगरबद्दल केंद्राने निर्णय घेतला पाहीजे – संजय राऊत

Sanjay Raut made a statement about his candidature for the post of President

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोण कोणाला भेटते आणि काय करते हा चर्चेचा विषय नाही, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय भेटींवर दिली. यावेळी देवेंद्र फडणीवसांना ही संजय राऊत यांनी उत्तर दिले. त्यांच्याकडे तेव्हा पुरेसे संख्याबळ होते. लोकशाहीमध्ये आपल्याला सख्याबळ असल्याशीवाय जिंकता येत नाही. 10 तारखेला चीत्र स्पष्ट होईल, असे संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाला एकत्र करण्याची ताकद शरद पवारांची – 

ईडीच्या कारवाईबद्दल त्यांना विचारले असता मी मागेही बोललो आहे. हे बरोबर चालेले नाही. मी टार्गेट असेन तर मला अटक करा, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आघाडी विषयीच्या वक्तव्यावर त्यांना विचारले असता मी असे म्हणालो की मा शरद पवार आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याबद्दल एक भूमीका होती. पवार साहेबांनी देशाचे नेतृत्व करावे आम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करू ही भूमीका त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. आमची अशी भूमीका आहे की या देशातील विरोधी पक्षाला एकत्र करण्याची ताकद शरद पवार साहेबांची आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान पदाचा विषय 2024 ला बघू –

यावेळी त्यांना पंतप्रधान पदाविषयी त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानावर विचारले असता, मी पंतप्रधान पदाविषयी बोललो नाही तर देशाचे नेतृत्व करण्याच्या क्षमते विषयी बोलतोय. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी आहेत. पंतप्रधान पदाचा विषय 2024 ला बघू . यावेळी त्यानी औरंगाबादची सभा अती विराट होईल असे सांगत नामांतराच्या मुद्यावर भाष्य केले. संभाजीनगर नाव तुम्ही आता घेताच आहात ना. जसे प्रयागराज झाले त्यावेळी केंद्राने लगेच नीर्णय घेतला तसा महाराष्ट्रकडून प्रस्ताव गेलेला आहे. केंद्राने निर्णय घेतला पाहीजे