‘ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात’, पंडित नेहरुंचा फोटो वगळल्याने संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

‘ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात’, पंडित नेहरुंचा फोटो वगळल्याने संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

'ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात', पंडित नेहरुंचा फोटो वगळल्याने संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

देश यंदा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च सेंटर’ने आयोजित केलेल्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाच्या पोस्टवर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Javahrlal Nehru) यांचा फोटो वगळल्याने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजपवर (BJP) चांगलाच निशाणा साधला आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) प्रियांका गांधी (priyanka Gandhi) सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांच्याशी मोदी सरकार आणि भाजपचे भांडण असेल पण पंडित नेहरुंशी वैर का? असा सावल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. ‘ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात’,  अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी अग्रलेखातून भाजपवर चांगलाच हल्लाबोल केलाय.

इतिहास पुसणे हे शौर्य नाही

पंडित नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार देशाच्या अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरुंचे नाव अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही, असा घाणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केलाय. तसेच पुढे राऊत म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इतिहास बदलला जात आहे काय यावर राजकीय वादळे उठतील. ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते इतिहासातील संदर्भ पुसण्याचे काम करतात, ही जगाची रीत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

नेहरुंना वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवले

आजादी का अमृत महोत्सवच्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचा फोटो वगळल्याने संजय राऊतांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केलाय. केवळ नेहरुच नाही तर मौलाना अबुल कलाम आझाद यांना देखील पोस्टरमध्ये वगळ्यात आल्याचे राऊतांनी म्हटले आहे. पोस्टरवर महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस,भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सरदार वल्लभभाई पटेल,राजेंद्र प्रसाद,मदन मोहन मालवीय आणि स्वांतत्र्यवीर विनायक दामोदक सावकर यांची छायाचित्र अगदी ठळकपणे आहे मात्र पंडित नेहरु त्याचप्रमाणे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा देखील फोटो पोस्टरमधून वगळण्यात आलाय. नेहरु आणि आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. नेहरुंना वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवले आहे,अशी टीका संजय राऊतांनी केलीय.


हेही वाचा – मी मुख्यमंत्र्यांसारखा डॉक्टर अन् राऊतांसारखा कंपाऊंडर नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

First Published on: September 5, 2021 10:10 AM
Exit mobile version