राज्यपालांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरायला देऊ नये, संजय राऊतांचा निशाणा

राज्यपालांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरायला देऊ नये, संजय राऊतांचा निशाणा

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय राज्यपालांवर बंधनकारक पण..., संजय राऊतांचा घणाघात

राजभवनामध्ये बसलेल्या व्यक्तीने स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरुन देऊ नये. यामध्ये या घटनात्मक पदाचं अवमूल्यन आणि अवहेलना होत आहे. हायकोर्टाने अप्रत्यक्ष तेच सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांच कौतुक करत टोला लगावला आहे. राज्यपाल प्रेमळ, मनमिळाऊ आहेत परंतू त्यांनी १२ आमदरांच्या नियुक्तीबाबत घेतलेली भूमिका राजकीय असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपालांनी राजकीय दबाव झुगारुन टाकला पाहिजे असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, हायकोर्टाने सांगितले आहे की, घटनात्मक पेच प्रसंग जो असतो. हा राज्यपालांकडून निर्माण होऊ नये हे आमचं मत आहे ते घटनात्मक प्रमुख आहेत. स्वतःला राजकीय प्यादं म्हणून त्यांनी वापरायला देऊ नये. राज्यपाल भाजपचे नेते आणि संघाचे प्रचारक असू शकतात त्याच्याविषयी आमची काही भूमिका असण्याचे कारण नाही. कारण राज्यपाल हा केंद्राचा पॉलिटिकल एजंट असतो. पण घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर कोणत्याही राज्यांचे राज्यपाल अतिक्रमण करत असतील तर ते या देशाच्या राज्यांच्या अधिकारंवर हल्ला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  हायकोर्टाच्या निकालानंतर राज्यपाल कोश्यारी – गृहमंत्री अमित शाह यांची भेट, चर्चा सुरु


राज्यपाल प्रेमळ व्यक्ती पण..

राज्यपाल अत्यंत सदवर्तनी, प्रेमळ, सुस्वभावी मनमिळाऊ आहेत या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि ज्या प्रकारे त्यांनी १२ आमदारांच्या संदर्भात भूमिका घेतली आहे. ती भूमिका राजकीय आहे. हे त्यांनाही माहिती आहे. मी त्यांना ओळखतो त्यांच्यासोबत संसदेत काम केलं आहे. मनापासून ते करत नसावेत पण शेवटी त्यांची भूमिका ज्या पक्षातून करण्यात आली आहे. त्या पक्षाच्या भूमिकेला अनुसरुन दबावाखाली काम करत असावेत. खर तर त्यांनी दबाव झुगारुन एक स्वाभिमानी बाण्याचे आणि आपण घटनेचं रखवालदार असल्याचे त्यांनी भूमिका घेणं गरजेचे आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गृहमंत्री अमित शाह यांना भेटले आहेत. काल (शुक्रवारी) हायकोर्टाचा निर्णय गृहमंत्र्यांना समजला असेल. अमित शाह यांनी जसे ३७० कलम हटवले. खूप मोठं ऐतिहासिक कार्य करुन वाहवाह मिळवली तसेच महाराष्ट्रात १२ आमदारांबाबत राजकीय बंदी घातली आहे ती हटवा असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.


राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप नाही; हायकोर्टाचा १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत राज्यपालांना सूचना


 

First Published on: August 14, 2021 11:10 AM
Exit mobile version