भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला..,राऊतांचा राज ठाकरेंना टोला

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला..,राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गृहविभागासह पोलीस देखील अॅक्शन मोडवर आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेतली. मात्र, या परिषदेतून ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. राज ठाकरेंची पत्रकार परिषद संपल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. भोंगेबाज प्रकरणी राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला, असं संजय राऊत म्हणाले.

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते. मग त्यावरही बंदी आणणार का? असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारला ३ मे अल्टिमेटम दिला होता. परंतु आज हा अल्टीमेटम संपला असून ४ तारखेपासून आम्ही कोणाचही अजिबात ऐकणार नाही, अशा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानुसार राज्यातील काही भागात मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजविण्यात आली. मात्र, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे. अनेक मनसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा : ट्रीपल टेस्ट पूर्ण न केल्यानं आरक्षण कोर्टात टिकलं नाही, कोर्टाच्या आदेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया


 

First Published on: May 4, 2022 4:08 PM
Exit mobile version