बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित जाहीर करा, अन्यथा…, संजय राऊतांचा इशारा

बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित जाहीर करा, अन्यथा…, संजय राऊतांचा इशारा

नरेंद्र मोदी 400 पार तर आम्ही 300 पार, संजय राऊतांचा दावा

नवी दिल्ली – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफळला असून दोन्ही राज्यातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी केंद्र सरकारकला निर्वाणीचा इशारा दिला आहे. केंद्रात असलेल्या महाशक्तीला सांगणं आहे, ताबडतोब बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित जाहीर करा, अन्यथा महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील, असा इशारा राऊतांनी दिला आहे. आज त्यांनी दिल्लीतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

हेही वाचा उठ मराठ्या उठ! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

गेल्या २४ तासांपासून सीमाभागात सरकारी प्रेरणेने वाहनांची तोडफोड, हल्ले होत आहेत. आणि प्रतिकार करणाऱ्यां महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरात घुसून तुरुंगात डांबलं जात आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या भेटीला दिल्लीत जाणार आहेत. पण त्यांना माहित नाहीय का महाराष्ट्रात काय चाललंय? महाराष्ट्राचे लचके सहजतेने तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं. अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर आली नव्हती. एवढं हतबल सरकार आणि हतबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊच शकत नाही. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे.

‘दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. कर्नाटकात जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार आहे. यांना आपल्या महाराष्ट्रतील जनतेची, सीमांची काळजी नाही. महाराष्ट्राच्या सीमा कुरतडत चालल्या आहेत. आणि सरकार नामर्दासारखं बसलं आहे. अशावेळेला विरोधी पक्षाची जबाबदारी जास्त आहे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे. ही लूट दिल्लीच्या चरणी विनासायस अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलं आहे. आता कर्नाटकातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री भाई आहेत. त्यांना भाई म्हणतात. मग भाईगिरी दाखवा ना. मग कसले भाई? तुम्ही कधी लाठ्या खालल्या हे दाखवा. लाठ्या खालल्या असतील तर दाखवा महाराष्ट्राला. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत आक्रमकपणे म्हणाले.

हेही वाचा – कन्नडिगांचा बेळगावात भ्याड हल्ला

 

First Published on: December 7, 2022 10:23 AM
Exit mobile version