संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; कोर्टात काय होणार?

संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; कोर्टात काय होणार?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केलेल्या खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टात करणार आहे.

ईडीची कोठडी वाढवण्याची मागणी –

ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, राऊतांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे. आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची मागणी फेटाळत संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. ईडी आज पुन्हा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळण्याची मागणी करणार आहे.

ईडीचे आरोप काय –

संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्यात थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.

First Published on: August 4, 2022 8:18 AM
Exit mobile version