Santosh Parab Attack Case: नितेश राणे यांच्या जामिनावर सोमवारी होणार फैसला

Santosh Parab Attack Case: नितेश राणे यांच्या जामिनावर सोमवारी होणार फैसला

जिल्हा बैंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आज शरण येण्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर झाले. सुप्रीम कोर्टाने शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली होती. मात्र आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्यासोबत ख्यातनाम वकील ॲड. सतीश मानशिंदे, ॲड. संग्राम देसाई, ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. उमेश सावंत, ॲड. राजेश परुलेकर उपस्थित होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार की नाही? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.


हेही वाचा – Santosh parab attack case: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरणागती


 

First Published on: January 28, 2022 2:46 PM
Exit mobile version