कोल्हापुरातून महायुती फोडणार प्रचाराचा नारळ!

कोल्हापुरातून महायुती फोडणार प्रचाराचा नारळ!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजाप युती झाली असून, या महायुतीच्या प्रचाराचा नारळ येत्या रविवारी कोल्हापूर येथे फुटणार आहे. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदान येथे महायुतीची पहिलीच जाहीर सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, युती झाली असली तरी शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अजूनही मनोमिलन झालेले नाही. हेच मनोमिलन घडवून आणण्यासाठी याआधी मेळावेदेखील घेण्यात आले होते पण त्याचा फारसा फायदा झाला नव्हता. त्यामुळे आता महायुतीच्या या जाहीर सभेनंतर तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापुरातील युतीच्या या पहिल्या प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील याकडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या जाहीर सभेद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. तसेच या जाहीर सभेतून कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला जाणार आहे.

मित्रपक्ष अजूनही नाराज…

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांना किती जागा सोडणार हे अजूनही ठरले नसल्याने मित्रपक्ष अजूनही नारज आहेत. त्यामुळे मित्रपक्षांची नाराजी भाजपा दूर करण्यात यशस्वी होणार का? हे देखील पहाण महत्त्वाचे ठरणार आहे. 
First Published on: March 21, 2019 4:11 PM
Exit mobile version