आपण कावळ्यांची नव्हेतर मावळ्यांची चिंता करावी

आपण कावळ्यांची नव्हेतर मावळ्यांची चिंता करावी

शरद पवार यांचा राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांना सल्ला

आपण सर्वांनी कावळ्यांची नव्हेतर मावळ्यांची चिंता करावी, पक्ष सोडून जाणार्‍यांकडे फारसे लक्ष देऊ नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे आयोजित महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत सांगितले.

मुंबईत रविवारी राष्ट्रवादी पक्षातील महिला कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहेत. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. यापुढे आपण आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी असेही पवार म्हणाले.

राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचे हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे पवारांनी सांगितले.

येणार्‍या निवडणुकीला सामोरे कसे जावे याची रणनिती आपण आखत आहोत. यात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातील. माझा आग्रह हा आहे की आपण अडचणीतून जात आहोत. त्यासाठी तरुणांना व महिलांना पुढाकार देण्याचे काम केले जाईल. पक्षातील नवीन चेहरे समोर आणण्यासाठी विचार केला जाईल, असेही यावेळी पवार म्हणाले.

First Published on: August 19, 2019 5:14 AM
Exit mobile version