Sharad Pawar : रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, सत्यता समोर येईल – पवार

Sharad Pawar :  रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, सत्यता समोर येईल –  पवार

संग्रहित छायाचित्र

ओडिशा रेल्वे अपघातानंतर (Odisha Train Accident) देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात आतापर्यंत 261जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अद्यापही बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या रेलवे अपघाताची चौकशी व्हावी. कारण सत्यता समोर येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले.

रेलवे अपघाताची चौकशी व्हावी

शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी सर्वांकडून केली जात आहे. त्यामधून सत्यता समोर येईलच. त्यानंतर पुढील काही गोष्टी सुचवता येतील, असं शरद पवार म्हणाले.

लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेचे मंत्री असताना २ वेळा रेल्वे अपघात झाला होता. पंडीत जवाहरलाल नेहरू राजीनामा देण्याच्या दिवशी लालबहादूर शास्त्रींनी ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी या पदावर राहू इच्छित नाही. असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता. आता हे एक उदाहरण देशाच्या समोर आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटत असेल तसं करावं, असंही शरद पवार म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील एका गावात बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली. भीमजयंती साजरी करण्यावरून वाद होता. तसेच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले की, हा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करत गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना त्यांची जागा दाखवावी, असं शरद पवार म्हणाले.

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अजित पवारांची मागणी

आतापर्यंत मोठ्या अपघातांची जबाबदारी स्वीकारून पाच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. तसेच या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. कारण खालच्या अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी वाढते. यामध्ये सिग्नलची व्यवस्था, बुलेट ट्रेन विविध भागांत सुरू करणार असल्याचं म्हटलं जातंय. गोवा ते मुंबई आज वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार होती. परंतु या दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काही ठिकाणी रेल्वेच्या मार्गांचं खासगीकरण देखील करण्यात आलंय. कारण तो केंद्र सरकार आणि रेल्वे विभागाचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : Ajit Pawar : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अजित पवारांची मागणी


 

First Published on: June 3, 2023 5:28 PM
Exit mobile version