मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे येणार ठाण्यात; स्वागताची जय्यत तयारी

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे येणार ठाण्यात; स्वागताची जय्यत तयारी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंड करून भाजपच्या सोबतीने मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथम ठाण्यात येत आहे. यासाठी शिंदे गटाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री त्यांचे गुरुवर्य स्व. आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेत, तेथे नतमस्तक होणार आहेत. मग आनंद आश्रम व टेंभीनाक्यावरील दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी जाणार आहेत. (Shinde will visit Thane for the first time after becoming Chief Minister; Well prepared for the reception)

हेही वाचा -अग्निपरीक्षेनंतर एकनाथ शिंदे करणार बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन

साधारण पणे मुख्यमंत्र्यांचे दुपारनंतर ठाण्यात आगमन होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्री यांचे अभिनंदनासाठी येणाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, ठाणे शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊ बंडाचा झेंडा हाती घेतला. हा बंड सुरत येथून सुरू झाला आणि आसाम करत तो गोव्यापर्यंत पोहोचला. याचदरम्यान नऊ दिवस गेले. अखेर शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. अधिवेशन बोलवून विधानसभा अध्यक्ष निवडला.

हेही वाचा – ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामिल

या कालावधीत जवळपास १५ दिवस शिंदे हे ठाणे शहरापासून लांब होते. ते आपल्या कार्यकर्त्यांना तसेच निवासस्थानीही आले नाहीत. त्यातच मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच ठाण्यात येत आहे. यासाठी रविवारी माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे आणि विलास जोशी आदी मंडळींनी आनंद आश्रमात एक बैठक बोलून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री यांच्या स्वागतासंदर्भात काही सूचना दिल्या.

असा असेल कार्यक्रम

ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर (आंनद नगर चेक नाका) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल. तेथून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर टेंभी नाका येथील आनंदाश्रम येथे भेट देणार तसेच समोरील पुतळ्याला अभिवादन करणे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या लुईसवाडी येथील ‘शुभ-दिप’ या निवास्थानी जातील.

हेही वाचा – कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय? शिवसेनेचा हल्लाबोल

चोख पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील ‘शुभ-दीप’ या निवासस्थळाला मातोश्रीप्रमाणे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच ठाण्यात येणार असल्याने ठाणे शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने चांगली कंबर कसली आहे.

First Published on: July 4, 2022 11:15 AM
Exit mobile version