शिवसेना आमदार रमेश बोरणारेंवर भावजयीकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिवसेना आमदार रमेश बोरणारेंवर भावजयीकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबादः भावजयीला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. रमेश बोरणारे हे शिवसेनेचे औरंगाबादमधील वैजापूर मतदारसंघातून आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रमेश बोरणारे यांची भावजय ही भाजपच्या कार्यक्रमाला गेली होती, त्यामुळे बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस? म्हणत तिला मारहाण केली. तसेच त्यांच्याविरोधात तिने विनयभंगाचा गुन्हाही दाखल केलाय.

विशेष म्हणजे आमदार रमेश बोरणारे यांच्या भावजयीनं त्यांच्या पतीलाही मारहाण केल्याचा आरोप केलाय. बोरणारेंनी कुटुंबातील काही व्यक्तींनाही मारहाण केली असून, याआधीही फेब्रुवारी महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. आता विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

नेमकं काय घडलं?

फेब्रुवारी महिन्यात पीडितेच्या गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. परत दुसऱ्या दिवशी वैजापुरातील गोदावरी कॉलनीमध्ये एका कार्यक्रमाला त्या गेल्या असता तिथे त्या आणि आमदार रमेश बोरणारे समोरासमोर आले. तेव्हा भाजपच्या कार्यक्रमाला का गेलीस म्हणत बोरणारेंनी तिला बेदम मारहाण केल्याचा तिने आरोप केलाय.


विशेष म्हणजे 19 फेब्रुवारीला चित्रा वाघ यांनी ट्विट करत रमेश बोरणारेंवर निशाणा साधला होता. आज म्हणे महिलाधोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी अर्पण केलाय.. त्याचं शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारेने भाजपच्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली.. गुन्हा दाखल पण कारवाई शtन्य
उलट पीडितेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याचं काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत सांगितलं होतं.


हेही वाचाः मुंबईत IPL खेळाडूंसाठीच्या बसची मनसेकडून तोडफोड, स्थानिक व्यावसायिकांना कंत्राट न दिल्याने वाहतूक सेना आक्रमक

First Published on: March 16, 2022 11:31 AM
Exit mobile version