घरक्रीडामुंबईत IPL खेळाडूंसाठीच्या बसची मनसेकडून तोडफोड, ६ अज्ञातांविरोधात FIR दाखल

मुंबईत IPL खेळाडूंसाठीच्या बसची मनसेकडून तोडफोड, ६ अज्ञातांविरोधात FIR दाखल

Subscribe

मुंबई वाहतूक सेनेने इंडियन प्रिमियर लीगच्या बसेसची तोडफोड केली आहे. मुंबईत परप्रांतीयांविरोधातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील व्यावसायिकांना वाहतूकीचे कंत्राट दिले नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ताज हॉटेलमध्ये आयपीएल खेळाडूंची बस उभी होती. त्या बसची तोडफोड करुन मनसे वाहतूक शाखेने एल्गार केला आहे.

यंदा आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रात करण्यात आले आहे. आयपीएलसाठी खेळाडू मुंबईत दाखल होत आहेत. खेळाडूंसाठी बसेस ठेवण्यात आल्या आहेत. या बसचे वाहतूकीचे कंत्राट राज्यातील किंवा मुंबईतील वाहतूक व्यावसायिकांना देण्यात आले नसल्यामुळे मनसे वाहतूक शाखेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

मनसेने मुंबईतील ताज हॉटेलबाहेर आयपीएलमधील खेळाडूंच्या बसेस लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या बसेस फोडल्या असून मनसेचा दणका अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन बसच्या काचा फोडल्या आहे. परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

आयपीएलच्या खेळाडूंना हॉटेल ते मैदानावर जाण्यासाठी बसेसचा वापर करण्यात येतो. राज्यातील वाहतूक व्यापाऱ्यांना या गोष्टीचे कंत्राट न देता दिल्ली आणि गुजरातमधून या बसेस मागवण्यात येत असतात. स्थानिक व्यापाऱ्यांना वाहतूकीची परवानगी द्यावी अशी मनसेची मागणी होती. परंतु राज्याच्या बाहेरील व्यापाऱ्यांना कंत्राट दिल्याने मनसेने दणका दाखवला आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून ६ जणांविरोधात एफआयआर दाखल

बसेसची तोडफोड केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ६ अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. आयपीसीच्या कलम १४३,१४७,१४९,४२७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तोडफोड करण्यात आलेल्या बसेस दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आहेत.


हेही वाचा : On This Day: सचिन तेंडुलकरने १०० वे शतक झळकावून रचला इतिहास, तरीही चाहत्यांची तुटली मनं

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -