Toolkit case: राष्ट्रहितासाठी मोदींवर टीका करणं योग्यच – संजय राऊत

Toolkit case: राष्ट्रहितासाठी मोदींवर टीका करणं योग्यच – संजय राऊत

भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी, पंतप्रधानांबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली

देशात बहुचर्चित टूलकिट प्रकरणी २२ वर्षीय पर्यावरणवादी तरुणी दिशाला रवीला दिल्ली पोलिसांना अटक केली होती. आता तिला काल (शुक्रवार) पटियाला न्यायालयाने दिशाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, ‘पर्यावरणाबद्दल बोलणाऱ्या मुलांमुळे देशाला धोका कसा होवू शकतो? देश इतकाही कमजोर नाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच राष्ट्रहितासाठी मोदींवर टीका करणं योग्यच आहे.’

आणीबाणीच्या काळात जे झालं, ते आज होतंय

पुढे संजय राऊत म्हणाले की, ‘इंदिरा गांधीच्या काळात राष्ट्रपतीच्या सहीने आणीबाणी लागू करण्यात आली होती. घटनेनुसार आणीबाणी जाहीर झाली होती. पण आता छुप्या पद्धतीने देशात आणीबाणी आहे. आणीबाणीच्या काळात जे झालं, ते आज होतंय. आता आणीबाणी इंगित भाषेचा आहे.’

इंधन दरवाढी संदर्भात काय म्हणाले संजय राऊत?

‘इंधन दरवाढी झळ भाजपच्या लोकांनाही बसतेय. पण भाजप नेत्यांना इंधन दरवाढीचा चटका बसत नाही का? भाजपची लोकं इंधन दरवाढीबद्दल का बोलत नाहीत?,’ असा सवाल यावेळ संजय राऊत यांनी उपस्थित केला.

विरोधी पक्षामुळे कोरोनाचे प्रमाण वाढले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दूरदुष्टी आहे. जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला होता, तेव्हा विरोधी पक्षाने आंदोलन केली. धार्मिका राजकरण सुरू केलं. त्यामुळे हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता केली केली. विरोधकांच्या विरोधामुळे सर्व काही राज्यामध्ये सुरू करण्यात आलं. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ आहे. विरोधी पक्षामुळे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता रुग्ण वाढण्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार का?, असा सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे.


हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय – वडेट्टीवार


 

First Published on: February 20, 2021 2:42 PM
Exit mobile version