इतके दिवस आरोप करणारे सोमय्या आता कुठे गायब झालेत?, दिपाली सय्यदचा सवाल

इतके दिवस आरोप करणारे सोमय्या आता कुठे गायब झालेत?, दिपाली सय्यदचा सवाल

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवून देत किरीट सोमय्यांनी अनेकांना जेरीस आणले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे ते घोटाळे बाहेर काढत होते. पण आता अटकेच्या भीतीनं किरीट सोमय्या स्वतःच कुठेतरी गायब झाले आहेत. विशेष त्यावरूनच आता अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केलाय.

सध्या घाणेरडं राजकारण सुरू असून, एकमेकांच्या घरातील वाभाडे काढले जात आहेत. जातीपातीचे राजकारण आणि ईडीच्या कारवाया सुरू आहेत. इतके दिवस आरोप करणारे सोमय्या आता स्वतःच गायब झाले आहेत. याचा आता लोकांनी काय अर्थ काढावा, तसेच कोण कसं आहे याचा निर्णय स्वतःच घ्यावा, असंही दिपाली सय्यद म्हणाल्यात. शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं टिटवाळा मंदिर येथे महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दिपाली सय्यद बोलत होत्या.

आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्षात रोजगार दिल्यावरच महिला सक्षम होणार आहेत. पालक मुलगी झाल्यावर मुलीच्या लग्नासाठी दागिने तयार करतात, मात्र दागिने बनवण्याऐवजी मुलींच्या शिक्षणावर खर्च केला तर मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहणार असून, व्यवसाय करेल आणि लग्नानंतरसुद्धा नवऱ्याला हातभार लावू शकते, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

अज्ञातवासात सोमय्यांकडून व्हिडीओ शेअर

2013 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने विक्रांत युद्धनौकाला 60 कोटीत भंगारवाल्याला विकण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचा निषेध केला. भाजपने 10 डिसेंबरला चर्चगेट स्टेशनवर एक तासाभराचा सांकेतिक, प्रतीकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम घेतला. सुमारे 11 हजार रुपये जमले. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे खासदार, मी स्वत: 17 डिसेंबर 2013 ला राष्ट्रपतींना भेटलो. त्यांना ही माहिती दिली. आज 10 वर्षांनंतर संजय राऊत सांगतात किरीट सोमय्या यांनी 58 कोटी हडपले. चार बिल्डरांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करून नील सोमय्या यांच्या कंपनीत जमा केले. एक कागद नाही, पुरावे नाही. पोलिसांकडे कागद नाहीत, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.


हेही वाचाः माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटकवण्याचा सरकारचा प्रयत्न होता : प्रवीण दरेकर

First Published on: April 12, 2022 4:27 PM
Exit mobile version