ईडीची नोटीस शोधायला माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय – संजय राऊत

ईडीची नोटीस शोधायला माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय – संजय राऊत

राणे, कपिल पाटील, भारती पवार हे राष्ट्रवादी-शिवसेनेचे प्रॉडक्ट; राऊतांची खोचक प्रतिक्रिया

पीएमसी बँक आणि एचडीआयएल या दोघांमधील कर्ज वाटप आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याचं वृत्त रविवारी समोर आलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मला कोणतीच नोटीस आली नसल्याचं सांगितलं. दरम्यान, आज संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीसीवरुन भाजपवर निशाणा साधला. भाजपचे लोक सांगत आहेत की, मला ईडीची नोटीस आली आहे. माझ्याकडे तर ईडीची नोटीस आलेली नाही. ईडीची नोटीस शोधायला माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“भाजपचे लोक सांगत आहेत की, मला ईडीची नोटीस आली आहे. मी काल पासून पाहतोय. इथे कोणी आलेलं नाही आहे. आता मी माझा माणून भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. कादाचीत तिकडे कुठे नोटीस अडकली असेल. तिथून माणूस निघाला असेल त्यांच्या पक्षाचा,” असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. यावेळी त्यांनी ईडीची नोटीस हे राजकारण असल्याचं म्हटलं आहे. पत्नीला ईडीची नोटीस मिळणे हे राजकारण आहे. या विषयावर शिवसेना भवनात दोन वाजता बोलणार आहे,” असं राऊत म्हणाले.

कर नाही तर डर कशाला? – देवेंद्र फडणवीस

संजय राऊत यांना ईडीची नोटीस आल्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. “पीएमसी घोटाळ्याबाबत ईडीने संजय राऊत किंवा त्यांच्या पत्नीस नोटीस पाठवल्याची नेमकी माहिती मला अजूनपर्यंत मिळालेली नाही. मात्र, कर नाही तर डर कशाला? संजय राऊत हे प्रतिभावान व्यक्ती आहेत. काम नसलेल्या वेळेत ते अनेकदा शेरोशायरी, कवितांच्या ओळी ट्विट करत असतात. ईडी त्यांचे काम करीत आहे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

First Published on: December 28, 2020 11:02 AM
Exit mobile version