धक्कादायक! वैद्यकीय तपासणीसाठी बलात्कार पीडितेला पोलिसांनी करायला लावली 2 किमी पायपीट

धक्कादायक! वैद्यकीय तपासणीसाठी बलात्कार पीडितेला पोलिसांनी करायला लावली 2 किमी पायपीट

Mumbai Police

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या सासरच्या मंडळींविरुद्ध बलात्कार, काळी जादू आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार एका दलित महिला वकिलाने पोलिसांकडे नोंदवली होती. मात्र, एका महिला कॉन्स्टेबलने सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी या पीडित महिलेला सुमारे 2 किमी पायपीट करण्यास भाग पाडले, असा दावा पीडितेच्या वकिलाने मंगळवारी केला.

पीडित महिला मुंबई उच्च न्यायालयात वकील आहे. लग्न झाल्यापासून वारंवार बलात्कार, छळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी या पीडित महिलेने तिचा अनिवासी भारतीय पती, एक तांत्रिक, तिचा दीर आणि इतर नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, असे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले. भोईवाडा पोलिसांनीही काही दिवसांपूर्वी या महिलेची तक्रार नोंदवली होती. पण बराच पाठपुरावा केल्यानंतर अखेर मंगळवारी परळच्या केईएम रुग्णालयात या पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्याचे निश्चित झाले, अशी माहितीही नितीन सातपुते यांनी दिली.

एका महिला कॉन्स्टेबलने यासाठी पीडित महिलेकडे टॅक्सीचे भाडे मागितले, मात्र पीडित महिलेकडे ते नव्हते. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलने तिला तिथून 2 किलोमीटर चालत जाऊन बीएमसीच्या केईएम रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली, असा दावा वकील सातपुते यांनी केला आहे. अशा बलात्कार पीडितांसाठी निर्भयाची वाहने नेमकी कुठे आहेत? असा सवाल करून सातपुते म्हणाले की, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसाच्या गाडीतून घेऊन जाण्याऐवजी तिला चालत कसे घेऊन गेले, हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे.

हेही वाचा – मी अपशब्द वापरला असेन तर, तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन – संजय शिरसाट

नितीन सातपुते यांनी ही बाब पोलीस उपआयुक्त (झोन 4) प्रवीण मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. आता यावर पोलीस काय कारवाई करतात, याची प्रतीक्षा सातपुते यांना आहे.

हेही वाचा – आयपीएलनंतर होणार WTCचा अंतिम सामना, बीसीसीआयने दिली आयपीएलच्या संघांना तंबी

First Published on: March 28, 2023 11:03 PM
Exit mobile version