रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने रेमेडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा – राजेंद्र शिंगणे

रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने रेमेडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा – राजेंद्र शिंगणे

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या जनतेला आता रेमेडेसिवीरच्या इंजेक्शनकरता रांगेत तासन तास उभे राहावे लागत आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी एका मराठी वृत्तवाहिनीने बातचित केली असता त्यांनी सांगितले की, ‘दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संखेने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या Active रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच राज्यातील Active रुग्णांचा आकडा देखील ५ लाखाच्यावर आहे. सुरुवातीच्या काळात रुग्णांचा आकडा कमी होता. मात्र, हा आकडा अचानक वाढला असल्यामुळे आता रेमेडेसिवीरच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. रेमेडेसिवीर बनवणाऱ्या सात कंपन्यांकडे राज्याला ५० ते ५५ हजार लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. याच संदर्भात नुकतीच रेमडेसिवीर उत्पादकांशी चर्चा केली. त्यादरम्यान, राज्यात होणारा पुरवठा वाढला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर त्यांनी सांगितले आहे की, पुढील १५ एप्रिलपर्यंत राज्यात दरदिवशी ५० ते ५५ हजार लसींचासाठा पुरवला जाईल. तसेच त्यानंतर ७० ते ७५ लसी दरदिवशी महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

९६ हजार ६९४ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध

राज्यात ९६ हजार ६९४ रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयात उपलब्ध असून ४९ हजार ४२४ रेमडेसिवीर इंजेक्शन खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत. मात्र, सध्याच्या घडीला सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या फार कमी आहे. तर खासगी रुग्णालयात रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत असल्याची ही वस्तुस्थिती आहे.

पुढील ८ दिवासांचा साठा उपलब्ध

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पुढील आठ दिवसात उपलब्ध होणार असून सध्या लागणारा किंवा त्याहूनही अधिक साठा सध्या सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यामुळे जो काही अतिरिक्त साठा आहे, तो खासगी रुग्णालयांना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापूर्वीच आपण याबाबतची मागणी औषध कंपन्यांकडे केली होती. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडाही घटलेला होता. तर महाराष्ट्र राज्याच्या बाजूचे राज्य कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब , आंध्रा, कर्नाटक या राज्यातून देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली होती. त्यामुळे केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्याप्रमाणे इतर राज्याला देखील रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे लागत आहे, त्यामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे जे मरतात ते जगायच्या लायकीचे नाहीत, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य


 

First Published on: April 8, 2021 3:18 PM
Exit mobile version