…म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं, काँग्रेस नेत्याचे नाना पटोलेंकडे अंगुलीनिर्देश

…म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं, काँग्रेस नेत्याचे नाना पटोलेंकडे अंगुलीनिर्देश

Ashish Deshmukh on Nana Patole| नागपूर – काँग्रेसमधील फुटीचं खापर नाना पटोले यांच्यावर फोडल्यानंतर माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्यामागेही नाना पटोलेच (Congress Leader Nana Patole) दोषी असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं नसतं तर महाविकास आघाडी सरकार कोसळलं नसतं, असं आशिष देशमुख म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद मिळालं, मात्र त्यांनी ते सोडलं आणि त्यामुळेच पुढे विधानसभा अध्यक्षपद रिकामं राहिलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यासाठी नाना पटोले हेच जबाबदार आहेत,” असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.

हेही वाचा – भाजपामधून आलेल्या नाना पटोलेंना महत्त्वाची आठ पदे का दिली? काँग्रेस नेत्याचाच सवाल

येत्या दहा तारखेला मुंबईत आम्ही एक बैठक बोलावली आहे आणि त्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं आहे. त्यात पक्षाकडून वरिष्ठ नेते निरीक्षक म्हणून यावेत अशी आमची इच्छा असल्याचंही आशिष देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी

काँग्रेस अध्यक्षपदाची जशी निवडणूक घेतली तशीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदासाठीही निवडणूक घ्या अशीही मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस पक्षात नेहमी असे घोळ का होतात असा सवालही आशिष देशमुख यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, “गेल्या चार वर्षात नाना पटोले यांना आठ पदे मिळाली आहेत. महाराष्ट्रात दुसरं नेतृत्व नाहीच का? एकाच नेत्याचे एवढ्या वेळेला लाड का पुरवले जात आहेत? गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा बाहेर का निघतो? यामागे काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावं,” असं आशिष शेलार म्हणाले.

नाना पटोलेंना एवढी पदे का?

बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला डावलून भाजपातून आलेल्या नाना पटोले यांना चार वर्षांत महत्त्वाची आठ पदं का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी झालेल्या काँग्रेसमधील राड्यावरून त्यांनी नाना पटोले यांनांच जबाबदार धरलं होतं. आता पुन्हा त्यांनी नाना पटोलेंना लक्ष्य केलं आहे.

First Published on: February 6, 2023 9:57 PM
Exit mobile version