तळागाळातील मराठा समाजाला न्याय देणारे नेतृत्व आज हरपले… चंद्रकांत पाटील यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली

तळागाळातील मराठा समाजाला न्याय देणारे नेतृत्व आज हरपले… चंद्रकांत पाटील यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वेवर त्याच्या गाडीचा अपघात झाला. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. मराठा आरक्षणासहित मराठा समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते आग्रही होते. तळागाळातील मराठा समाजाला न्याय देणारे नेतृत्व आज हरपले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली !” असं ट्वीट शेअर करत राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त केला.

विनायक मेटेंचा अपघात कसा झाला?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. महामार्गावरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. रविवारी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडकडून मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. एका ट्रकने कट मारल्याने विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर जवळपास एक तास मदत मिळाली नाही. तसेच, 100 नंबरला फोन केला मात्र त्यांनीही फोन उचलला नाही. अथक प्रयत्नानंतर एका गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली, अशी माहिती मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.


 

हेही वाचा :विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू?, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात

First Published on: August 14, 2022 9:50 AM
Exit mobile version