घरताज्या घडामोडीविनायक मेटे यांचा जागीच मृत्यू?, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात

विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू?, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात

Subscribe

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे या अपघातात निधन झाले आहे. वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे या अपघातात निधन झाले आहे. वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला असावा अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले. (MGM hospital dr Kuldeep salgotra talks on vinayak mete dead in navi mumbai)

विनायक मेटे यांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. “विनायक मेटे यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होता. त्यांच्या डोक्याला झालेली गंभीर दुखापत पाहता त्यांचा मृत्यू अपघातास्थळीच झाला असावा. सकाळी 6:20 वाजताच्या सुमारास त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते”, असे डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

- Advertisement -

“रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी वेळी त्याचे शरीर कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांना अखेर मृत घोषित करण्यात आले. विनायक मेटे यांच्या सोबत आणखी दोन जण आहेत. एक गाडीचा चालक आणि एक सुरक्षारक्षक होता. या दोघांपैकी सुरक्षासरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे”, असेही डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

विनायक मेटे यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. ती फार गंभीर होती. अनेकदा डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे संबंधीत रुग्णाचा जागीच मृत्यू होतो. तसेच विनायक मेटे यांच्यासोबत झाले असावे. मात्र सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला याची माहिती शवविच्छेदनानंतर समजणार असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

- Advertisement -

“विनायक मेटे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षकाच्या लीव्हर, छाती, डोक आणि शरीराच्या काही भागांत गंभीर जखम झाली आहे. या दोघांवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत”, असेही डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.


हेही वाचा – जेव्हा-जेव्हा ते भेटले तेव्हा-तेव्हा त्यांची तळमळ जाणवली; विनायक मेटेंच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -