चित्रा वाघ यांचा मॉर्फ फोटो व्हायरल: बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय जातोय – सुधीर मुनगंटीवार

चित्रा वाघ यांचा मॉर्फ फोटो व्हायरल: बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय जातोय – सुधीर मुनगंटीवार

चित्रा वाघ यांचा मॉर्फ फोटो व्हायरल: बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय जातोय - सुधीर मुनगंटीवार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपच्या उपाध्यक्ष चित्र वाघ सातत्याने आवाज उठवत आहेत. संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणी त्यांनी लावून धरली आहे. पण सध्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘चित्रा वाघ यांचा आवाज दाबण्यासाठी अशा पद्धतीने सरकार खोटे नाटे चित्र प्रसारित बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे.’

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ फोटोमध्ये संजय राठोड आणि त्या एकदम जवळे उभे आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. एवढेच नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. याशिवाय चित्रा वाघ यांनी यासंदर्भात दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही यांची कल्पना दिली आहे.

राठोड यांच्याविषयी काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

पुढे सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची किंवा तांब्याची नाही. तेव्हा संशय निर्माण होतो. हा जो संशय निर्माण झाला आहे. तो चौकशीच्या माध्यमातून दूर केला पाहिजे. जर निष्पाप असेल तर कारवाई होण्याचे कारण नाही आणि जर दोषी असेल तर सुटता होता कामा नये. छत्रपती शिवाज महाराजांना आम्ही विश्वास देतो की, तुमच्या या रयतेच्या राज्यात जरी तुम्ही आज आमच्या नसलात तरी तुमचा विचार आम्हाला दिशा देतो. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही मंत्रालयामध्ये फोटो लावतो, विधान भवनात जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन जातो.’


हेही वाचा – संजय राठोड यांची झोप उडवणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण? जाणून घ्या राजकीय कारकीर्द


 

First Published on: February 26, 2021 7:22 PM
Exit mobile version