मुंबई मेट्रो – 3 चे कारशेड आरे मध्येच होणार, सुप्रीम कोर्टाची परवानगी

मुंबई मेट्रो – 3 चे कारशेड आरे मध्येच होणार, सुप्रीम कोर्टाची परवानगी

मुंबई मेट्रो-3 चे कारशेड आरे मध्येच होणार असल्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. भाजपाने यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी कांजुरमार्गऐवजी आरेची निवड करण्याचा राज्य सरकारचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देणे न्यायालयास अशक्य असल्याचे सांगून सुप्रीम कोर्टाने आरेमधील 84 झाडे कापण्यास परवानगी दिली आहे. तसेच या प्रकल्पास विरोध करणाऱ्या याचिकांवर अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर भाजपने ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचा अहंकार मोडला, असं ट्वीट भाजपने केलं आहे.

मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्ये उभारण्यास पर्यावरणवाद्यांनी आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने कारशेडसाठी आरेची केलेली निवड योग्य ठरवली असून कारशेडच्या बांधकामासाठी 84 झाडे कापण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


हेही वाचा : प्रोजेक्ट चांगला आहे की वाईट? याबाबत तज्ज्ञांनी बोलावं, रिफायनरी प्रकल्पावरून केसरकरांचं मोठं


 

First Published on: November 29, 2022 8:20 PM
Exit mobile version