“सुप्रिया अजिबात बोलू नकोस…” अजित पवारांनी केलं शांत

“सुप्रिया अजिबात बोलू नकोस…” अजित पवारांनी केलं शांत

अवधुत गुप्तेने सुप्रिया सुळेंना कोण जास्त प्रभावी अजित पवार की देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी क्षणात उत्तर दिलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

हेही वाचा – “आधी जेवून घ्या, मग बोलतो”; पवारांचे कार्यकर्त्यांना फोनवरून आवाहन

यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी देखील बोलावे, वडीलांना विनंती करावी, असे भावनिक आवाहन केले. मात्र त्यानंतर अजित पवारांनी लगेच माईक घेत ”सुप्रिया अजिबात बोलू नकोस..मी मोठा भाऊ म्हणून सांगतोय”, असे सांगितले. तर शरद पवार यांची मिसेस प्रतिभा पवार यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांना न बोलण्याचा इशारा केला. पण अजित पवार यांनी न बोलण्यास सांगितल्याने सुप्रिया सुळे देखील शांत बसलेल्या पाहायला मिळाल्या.

शरद पवार यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. तर त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी मनधरणी करण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील यावेळी अश्रू अनावर झाले तर जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील या सर्वांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली. पण शरद पवार हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.

शरद पवारांचे कार्यकर्त्यांना फोनवरून आवाहन
व्हाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना फोन लावला आणि कार्यकर्त्यांशी बोलण्यास सांगितले. “तुम्ही आता सगळे तिथे बसलेले आहात. पण आधी तुम्ही जाऊन जेवून घ्या, मग मी बोलतो,” असे आवाहन शरद पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले.

अजित पवार संतापले
सर्वांनी साहेबांसोबत काम केलेल आहे. पण काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवे नेतृत्व तयार झालं तर तुम्हाला का नको रे? असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. तर मला काही कळत नाही तुमचं. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यावर साहेब त्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील ना. साहेब बोलावतील तेव्हा सर्व येणारच आहेत. साहेब देशात फिरणारच आहे. त्यांचं मार्गदर्शन मिळणारच आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

First Published on: May 2, 2023 4:23 PM
Exit mobile version