राष्ट्रवादीचे २० पैकी फक्त ३ उमेदवार आघाडीवर

राष्ट्रवादीचे २० पैकी फक्त ३ उमेदवार आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालांना सुरुवात झाली असून पुन्हा एकदा भाजपने बहुतांश जागेवर आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड पाहता पहिल्या दोन तासात केवळ तीनच उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये बारामतीच्या उमेदवार सुप्रीया सुळे, साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि शिरूर मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. तर इतर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र सध्याच्या घडीला पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे २० उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे आहेत. मात्र सध्याच्या स्थितीनुसार तीनच उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.

बारामती –

सुप्रीया सुळे, राष्ट्रवादी – १,८६,२८७ मतांनी आघाडी
कांचन कुल, भाजप – १,६१,२५४ पिछाडी

सातारा –

उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी – ६१,८२८ मतांनी आघाडी
नरेंद्र पाटील, शिवसेना – ४९,५८७ पिछाडी

शिरूर –

डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी – १,२१,७५५ मतांनी आघाडी
आढळराव शिवाजीराव पाटील, शिवसेना – १,०६,८२२ पिछाडी

Maharashtra LokSabha Results : औरंगाबादमध्ये धक्कादायक कल; एमआयएमचे जलील आघाडीवर; खैरे पिछाडीवर

Election Results Mumbai Live : भाजपचे गोपाळ शेट्टी 47 हजार मतांनी आघाडीवर, उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

First Published on: May 23, 2019 10:28 AM
Exit mobile version