भुईगाव समुद्रात दिसली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

भुईगाव समुद्रात दिसली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

प्रातिनिधीक छायाचित्र

वसईच्या भुईगाव समुद्रात दिसलेल्या एका संशयास्पद बोटीमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. पोलीस आण तटरक्षक दलाने शोधमोहीम हाती घेतली आहे. सर्व सुरक्षा यंत्रणादेखील या प्रकारामुळे सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत तपास करुनही ही बोट कुणाची आणि कुठून आली, यासंदर्भात माहिती हाती लागलेली नव्हती. त्यामुळे यंत्रणांची चिंता वाढली आहे.

भुईगाव समुद्रकिनार्‍यापासून काही अंतरावर गुरूवारी सकाळच्या सुमारास स्थानिकांना ही बोट दिसली होती. स्थानिक मच्छिमारांनाही या बोटीचा संशय आला. ही बोट सुमारे दोन नॉटिकल मैल अंतरावर होती. विशेष म्हणजे बोटीवर कोणताही झेंडा किंवा निशाण नसल्याने संशय वाढला. यासंदर्भात तातडीने वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ड्रोनद्वारे बोटीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात कुणी आढळले नाही. त्यामुळे तटरक्षक दल आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची मदत घेण्यात आल्याचे परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले.

First Published on: September 2, 2021 9:43 PM
Exit mobile version