पंकजा मुंडे शिवसेनेत जाण्याच्या चर्चेबद्दल विखे-पाटील म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने…

पंकजा मुंडे शिवसेनेत जाण्याच्या चर्चेबद्दल विखे-पाटील म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने…

Radhakrushna Vikhe Patil on Pankaja Munde | सोलापूर – भाजपा नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्या लवकरच पक्षाला रामराम ठोकतील, अशाही वावड्या उठल्या आहेत. मात्र, या चर्चा निराधार असल्याचं भाजपा नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? फडणवीस म्हणाले, युवानेता म्हणून…

भाजपामध्ये अन्याय होत असले तर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं, अशी ऑफरस आमदार सुनील शिंदे यांनी दिली होती. तसंच, चंद्रकांत खैरेंनीही पंकजा मुंडेसंदर्भात विधान केलं होतं. यावरून राधाकृष्ण विखेपाटील यांनी खैरेंवर निशाणा साधला आहे.

“मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे हिच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहेत, असं चंद्रकांत खैरे म्हणाले होते.

यावर, राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की, “पंकजाताई या मोठ्या नेत्या आहेत, त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरेंचे विधान पाहता मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशीपक्ष वाटते. खैरेंनी अशी बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे. पंकजाताईंची भूमिका पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. ताई या पक्षाचे नेतृत्व करत आहेत आणि यापुढेही करत राहणार.

मनातील मांडे

पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्यामुळे मातोश्रींचं द्वार त्यांच्यासाठी उघडे ठेवलं असलं तरीही त्या जाणार नाहीत. पंकजा मुंडेंसाठी भाजप हेच त्यांचं घर. त्यामुळे मनातील मांडे मनातच राहणारच, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First Published on: January 13, 2023 6:51 PM
Exit mobile version