पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत? शिक्षण आयुक्तांचा शासनाला प्रस्ताव

पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत? शिक्षण आयुक्तांचा शासनाला प्रस्ताव

राज्यातील पुढील शिक्षण भरती एमपीएससीमार्फत करण्यात करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी शिक्षण आयुक्तालयाकडूनही शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे पुढील शिक्षण भरती एमपीएससीमार्फत होणार का? असा सवाल आता उमेदवारांकडून उपस्थित होत आहे. मात्र अधिकृत निर्णय जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत सध्या सुरु असलेल्या पद्धतीनुसारचं शिक्षण भरती होणार आहे.

राज्यातील शिक्षण भरती एमपीएससी मार्फत घ्यावी अशा प्रकराचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्ताकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबात शिक्षण सचिव, एमपीएससी सकारात्मक असल्याची माहिती समोर येतेय. परंतु शिक्षण भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत करण्यासाठी त्यातील नियमांमध्ये तांत्रिक बदल गरजेचे आहे.

मात्र एमपीएससीच्या आणि शिक्षण भरती विभागाच्या नियमांमधील बदल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिक्षण भरती सध्या आहे त्या नियमांनुसार होणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळातील शिक्षण भरती ही एमपीएससी मार्फत घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

राज्यातील शिक्षण भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. यातून 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षण भरती करण्यात आली होती. राज्यातील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीसाठी वारंवार मागणी केली जातेय.

शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टलद्वारे होत असताना यातही अनेक तांत्रिक अडचणी येतात, ज्यामुळे भरती प्रक्रिया लांबली आहे. मात्र पुढील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि तांत्रिक अडचणीशिवाय पार पडण्यासाठी एमपीएससीसारख्या अनुभवी संस्थेने काम करावे यादृष्टीने प्रयत्न करावे असा प्रयत्न सुरु आहेत.


…अन् पाहता पाहताच आभाळ फाटलं, ढगफुटीचा व्हिडीओ व्हायरल


 

 

 

First Published on: July 21, 2022 12:14 PM
Exit mobile version