…अन् पाहता पाहताच आभाळ फाटलं, ढगफुटीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा ढगफुटीचा व्हिडीओ तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. या व्हिडीओमध्ये डोंगरांच्यामध्ये एका नदीमध्ये ढगफुटी होताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत.

मानसूनचा महिना सुरू झाला आहे. यावेळी वातावरणात अनेक बदल होतात. कधी कधी तर मानसूनमध्ये प्रकृती आपलं आक्राळ-विक्राळ रूप दाखवते. दरम्यान, आता असेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहताच थरकाप उडू शकतो. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना घडल्या होत्या.ज्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाली होती. तर काहीजणांचा यामध्ये मृत्यू झाला होता. आता पुन्हा अशीच घटना घडलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.

निसर्ग नेहमीच आपल्याला त्याचे अनेक अद्भूत रंग दाखवतो. प्रत्येक ऋतूमधील बदलाचे फोटो जगभरातून समोर येतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा ढगफुटीचा व्हिडीओ तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. या व्हिडीओमध्ये डोंगरांच्यामध्ये एका नदीमध्ये ढगफुटी होताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत.

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळेच हा प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर, हा एक Time Lapas व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ढग हळूहळू पुढे सरकताना दिसत आहेत आणि ढगांच्या मधून पाणी पडते. यादरम्यान, नदीच्या वर पोहोचताच ढगफुटी होते आणि एकदम सर्व पाणी पडू लागते. या थरकाप उडवणार व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर युजर्स अनेक कमेंट करत आहेत. त्यातील एकाने लिहिलं की,”हा व्हिडीओ पाहून माझ्या अंगावर काटा आला आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं. “Wow अद्भूत.”