11 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, करीर यांच्याकडे वित्त, मिलिंद म्हैस्कर आरोग्य विभागात

संग्रहित छायाचित्र

मुंबईः राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. नितीन करीर यांची बदली वित्त विभागात करण्यात आली आहे. ते महसुल, नोंदणी आणि स्टॅम्प विभागात कार्यरत होते. हवाई वाहतूक आणि राज्य उप्तादन शुल्क विभागातील मिलिंद म्हैस्कर यांची आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची कृषी विभागात बदली करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी हे बदलीचे आदेश निघाले. डी. टी. वाघमारे यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विभागात बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजीव कुमार यांना  MAHATRANSCO चे CMD करण्यात आले आहे. श्रवण हर्डीकर यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर विभागातील सह आयुक्त जी.श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची छत्रपती संभाजी नगर येथीर राज्य कर विभागात सह आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नागपूर येथील
Textile संचालक पी. शिवाशंकर यांची श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

फेब्रवारी महिन्यातही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तुकडीतील राजेंद्र भोसले यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदावरून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. दीपा मुधोळ-मुंडे यांची औरंगाबाद येथील सिडकोच्या (न्यू टाऊनशिप) मुख्य प्रशासकपदावरून बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाविनोद शर्मा यांची बीड जिल्हाधिकारी पदावरून औरंगाबाद येथील सिडकोच्या (न्यू टाऊनशिप) मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली आहे. सिद्धराम सालिमठ यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. निधी चौधरी यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदावरून विक्रीकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली. निधी चौधरी यांना या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी होण्यापूर्वी त्या रायगडच्या जिल्हाधिकारी होत्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांची रायगडमधून उचलबांगडी करण्यात आली. आताही दीड वर्षाच्या आतच मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदावरून त्यांना हटविण्यात आले.

First Published on: May 2, 2023 5:49 PM
Exit mobile version