दहा वर्षीय मुंबईकर रिदमची ‘एव्हरेस्ट’वर चढाई, केला ‘हा’ विक्रम

दहा वर्षीय मुंबईकर रिदमची ‘एव्हरेस्ट’वर चढाई, केला ‘हा’ विक्रम

दहा वर्षीय रिदम मामनिया (Rhythm mamania) हिने एवरेस्ट (everest) शिखराचा बेस कॅम्प (everest base camp) सर करण्याचा विक्रम केला आहे. रिदम ही दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात राहणारी रहिवासी आहे. एवरेस्ट शिखराचा बेस कॅम्प 5364 मीटर उंचीचा असून, इतक्या लहान वयात ही उंची सर करणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. तिच्या या विक्रमामुळे संपूर्ण देशभरात तिचे कौतुक केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिदम मामनिया ही स्केटिंग खेळाडू आहे. स्केटिंगसोबतच तिला गिर्यारोहणाची (Trekking) आवड आहे. आतापर्यंच रिदमने माहुर्ली, सोंडई, कर्नाळा आणि लोहगड यासारख्या सह्याद्री पर्वतरांगांमधील काही शिखरे सर केली आहेत. तसेच, वयाच्या पाचव्या वर्षापासून पर्वतारोहणाची आवड असल्यामुळे तिने पहिला लांबचा 21 किलोमीटरचा ट्रेक हा गोवा-कर्नाटक सीमेवरील दूधसागर इथे केला होता.

हेही वाचा – ठाण्याच्या शरद कुलकर्णींनी घडवला इतिहास, रशियातील सर्वात उंच शिखर केलं सर

रिदमने जेव्हा एवरेस्टचा बेस कॅम्प सर केला त्यावेळी तिच्यासोबत तिचे आई-वडील हर्षल आणि उर्मी हे उपस्थित होते. रिदमने केलेले गिर्यारोहण महिनाभराचे होते. त्यापैकी बेस कॅम्पचा ट्रेक हा ११ दिवसांचा होता. बेस कॅम्प ट्रेकदरम्यान रिदम वेगवेगळ्या हवामानाच्या परिस्थितीत दररोज आठ ते नऊ तास चालल्याची माहिती मिळते.

हेही वाचा – माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या ‘त्या’ ठरल्या पहिल्या वयस्कर महिला

दरम्यान, एवरेस्टवरून खाली उतरताना बऱ्याचदा गिर्यारोहक (Trekker) हेलिकॉप्टरने परतण्याचा निर्णय घेतात. तसेच, काहीजण एवरेस्ट चढलेल्या मार्गानेच पुन्हा खाली उतरतात. या गिर्यारोहकांमध्ये आता रिदमच्याही नावाची नोंद झाली आहे.


हेही वाचा – Monkeypox Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट

First Published on: May 23, 2022 5:14 PM
Exit mobile version