घरताज्या घडामोडीMonkeypox Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट

Monkeypox Virus : कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना आता मंकीपॉक्स व्हायरसची दहशत वाढू लागली आहे. मंकीपॉक्सच्या (Monkeypox Virus) रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून आतापर्यंत १०० हून अधिक जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते (WHO), मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

युरोपीय देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर देशांत मंकीपॉक्स रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनमध्ये आता मंकीपॉक्स (Monkey Pox)नं धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण २० रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. फक्त एका इंग्लंड शहरात मंकीपॉक्सचे ११ रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

– मागील २१ दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

– या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.

– अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.

– रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाईल.

– मागील २१ दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.

– जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.

मंकीपॉक्सच्या संदर्भात केंद्र सरकारने जे काही निर्देश दिले असतील. ते आम्ही तंतोतंत पाळू. लगेचच आरोग्य विभाग हाय अलर्ट लक्षात घेऊन आम्ही सर्व आरोग्य विभागाच्या शेवटच्या घटकापर्यंत या सर्व गोष्टी कळवू. तसेच ज्या सुचना दिल्या आहेत त्यांचं तंतोतंत पालन करू, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

कसा वाढतो संक्रमणाचा धोका?

ताप आलेल्या व्यक्तींमध्ये जे सामान्य लक्षणं दिसतात. तीच लक्षणं यामध्ये दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. या कारणांमुळे मंकीपॉक्सची लक्षणं दिसून येतात. तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.


हेही वाचा : Monkeypox Virus चं होतेय ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’; ब्रिटनचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -