Live update : दहशतवाद्यांना शिक्षा होणारच – मोदींचे आश्वासन

Live update : दहशतवाद्यांना शिक्षा होणारच – मोदींचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौरा (सौजन्य-एएनआय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यवर आले असून यवतमाळ येथील कार्यक्रमात त्यांनी तेथील स्थानिक भाषेतून लोकांना संबोधित केले. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात सांगताना त्यांनी नागरिकांना विश्वास दिला की, पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांचा बदला घेतला जाईल. आपल्या शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामा घटनेबाबतचा जनतेचा आक्रोश मी समजू शकतो. दहशवादी लपले तरी त्यांना शिक्षा होणारच. सैनिकांवर पूर्ण विश्वास. दहशदवाद्यांना कधी, कुठे, कशी शिक्षा द्यायची हे आपले सैनिकच ठरवतील. आपल्या सैनिकांवर मला पूर्ण विश्वास आहे.

काय म्हणाले मोदीजी 

पाकिस्तान हा एक असा देश आहे. जो भारताच्या फाळणीनंतर अस्तित्वात आला. जिथे दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जो देश सरातळाला पोहोचला आहे. हा देश निस्तनाभूत होण्याच्या मार्गावर आहे. मी देशातील लोकांना आश्वासन देतो की, धीर धरा, जवानांच्या हल्ल्याचा बदला आपले लष्कर जवान घेतील. आपल्या लष्करावर आम्हाल विश्वास आहे, गर्व आहे. त्यांना संपूर्ण सूटही देण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना आसरा देणाऱ्यांना शिक्षा नक्कीच होईल.

बचत गटांच्या महिलांचा सत्कार 

पंतप्रधान मोदी आज राज्यातील दौऱ्यावर असून यवतमाळ येथील पहिल्या कार्यक्रमात त्यांनी १७ हजारांहून अधिक बचत गट चालविणाऱ्या महिलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यपाल विद्यासागर राव आदि मान्यवर उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणाला गती

यवतमाळसह राज्यात महिला बचतगटांचे मोठे जाळे आहे. बचतगटातील महिला या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व्हाव्यात, यासाठी अडीच पट जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ देण्यात असून त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. पांढरकवडा येथे आज विविध विकासकामांची पायाभरणी तसेच काही प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे मोदी म्हणाले की, बचतगटातील महिला उद्योग-व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हाव्यात यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत ४० हजाराची वाढ केली आहे. हा निधी आता एक लाख रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण महिलांनी वनोपजावर प्रक्रिया करून मुल्यवर्धनाचा लाभ घ्यावा. शासनाने वनोपजाचे आधारभूत खरेदी किंमत तीन वेळा वाढविली आहे.

First Published on: February 16, 2019 12:05 PM
Exit mobile version